धरमक परयटन : मदगल यथल परचन इतर मदर

Read full text
Authors: जी. एस. पिसे
Cited by: 0

Abstract

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात वसलेले मुदगल हे गाव धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. गोदावरी नदीच्या पात्रात वसलेल्या या क्षेत्रात हेमाडपंथी मंदिर स्थापत्यशैलीतील प्राचीन मंदिरे आढळतात. या संशोधन लेखामध्ये मुदगल येथील त्र्यंबकेश्वर–रामेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, खंडेश्वर मंदिर तसेच भारती गोसाव्याचा मठ यांचा ऐतिहासिक, स्थापत्यात्मक व धार्मिक अभ्यास करण्यात आलेला आहे. मुदगल येथील मंदिरे प्रामुख्याने शिवोपासनेशी निगडित असून त्यांतील शिल्पकला, नक्षीकाम, स्तंभरचना व गर्भगृह रचना या यादवकालीन हेमाडपंथी परंपरेचे दर्शन घडवितात. भारती गोसाव्याच्या मठातील समाध्या, शिवलिंगे, नंदी व विविध देवतांची शिल्पे ही त्या काळातील धार्मिक श्रद्धा व कलात्मक परंपरेचे उत्कृष्ट नमुने आहेत. तसेच मुदगल ऋषींच्या वास्तव्यामुळे या क्षेत्राला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले असून नागवाळी, पुत्रप्राप्ती विधी यांसारख्या धार्मिक विधींसाठी हे स्थान प्रसिद्ध आहे. या लेखातून मुदगल येथील प्राचीन मंदिरांचा वारसा, त्यांचे स्थापत्य सौंदर्य व धार्मिक महात्म्य स्पष्ट होते. मात्र अनेक वास्तू व शिल्पे दुर्लक्षित अवस्थेत असल्याचेही आढळून येते. त्यामुळे या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या जतन व संवर्धनाची गरज अधोरेखित होते.

Fields of Study & Subjects

Religious Tourism and Spaces Indian and Buddhist Studies Historical and Architectural Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026