परयटनच ससकतक परभव
Abstract
पर्यटन हा केवळ आर्थिक उपक्रम न राहता सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तन घडविणारा एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये पर्यटनाचा स्थानिक समुदायांच्या सांस्कृतिक संरचनेवर होणारा प्रभाव सैद्धांतिक व विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून अभ्यासण्यात आला आहे. या संशोधनासाठी गुणात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून दुय्यम माहिती स्रोतांमध्ये शैक्षणिक संशोधन लेख, शासकीय अहवाल, सांख्यिकीय माहिती व संबंधित साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासातून असे निदर्शनास येते की पर्यटनामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण, पारंपरिक कला-हस्तकलेचे पुनरुज्जीवन, सांस्कृतिक ओळखीचे संवर्धन व जागतिक स्तरावर स्थानिक संस्कृतीचे सादरीकरण घडून येते. तथापि, अनियंत्रित पर्यटन विकासामुळे संस्कृतीचे व्यापारीकरण, सांस्कृतिक एकसुरीकरण, स्थानिक मूल्यव्यवस्थेचा ऱ्हास व सामाजिक तणाव यांसारखे नकारात्मक परिणामही दिसून येतात. त्यामुळे पर्यटन विकास आणि सांस्कृतिक संरक्षण यांमध्ये संतुलन राखण्यासाठी शाश्वत, समुदाय-केंद्रित व सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील पर्यटन धोरणांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे या संशोधनातून अधोरेखित होते.
Fields of Study & Subjects
Diverse Aspects of Tourism Research
Community-based Tourism Development and Sustainability
Cultural Identity and Heritage
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026