छतरपत शवज महरजचय मलक परशसनतल शलदरच कमगर

Read full text
Authors: दिनेश दत्तात्रय सूर्यवंशी & प्रा. डॉ. युवराज शामरावजी माहूरे
Cited by: 0

Abstract

भारतात प्राचीन काळापासून मुलकी आणि स्थानिक प्रशासन व्यवस्था अस्तित्वात असल्याचे संकेत दिसतात. म्हणजेच मुलकी सत्तेचा आधार ग्रामीण भागातील प्रशासन व्यवस्था होता. १७ व्या शतकात ग्रामीण भागातील खेडेगावचे जीवन धावपळीचे होते. तर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अत्यंत अस्थिर अशीच होती. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन होईपर्यंत परिस्थिती अस्थिर होती. तत्म्कालीन व्यवस्थेत फार मोठा वर्ग ग्रामीण भागात जीवन जगत होता. म्हणून या मोठ्या वर्गाच्या जीवनात स्थिरता आणणे महत्त्वाचे होते. त्यासाठी सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी स्थानिक प्रशासनाला महत्त्व देताना प्रत्येक पातळीवर शिलेदारांची नेमणूक केली होती. त्यांची सत्ता एकतंत्री असली तरीही तिचे स्वरूप राजसत्ता असेच होते. त्यांच्या काळातही मराठी स्वराज्यात सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून लोकशाही पध्दतीप्रमाणे विविध जाती जमातीचे एकत्रीकरण करण्याबरोबर स्थानिक पातळीवरुन न्यायदानाचे कामकाज प्रशासनाच्या माध्यमातून पाहिले जात होते. या मुलकी प्रशासन व्यवस्थेला 'गोतसभा' असेही म्हणले जात होते. खेड्यातील गोत म्हणजे ग्रामीण भागातील सर्व जाती जमातीचा सहभाग असलेली व त्यांचे प्रतिनिधीत्व असलेली मुलकी प्रशासन व्यवस्था होती. या मुलकी प्रशासन किंवा गोतसभेत हिंदूप्रमाणे मुसलमानांनाही सहभागी करून घेतले होते. मुलकी प्रशासन व्यवस्थेत जात, धर्म किंवा पंथ यावर आधारलेल्या उच्च निच्चांचा असा भेदाभेद न करता गावातील बलुतेदार, आलुतेदार, गावकुसा बाहेरील महार-मांग आणि मुसलमान इत्यादी शिलेदारांना मुलकी प्रशासन व्यवस्थेत प्रतिनिधित्व देण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शुन्यातून स्वराज्याची स्थापना केली. हवालदील झालेल्या मराठी माणसांला आधार दिला, तो स्वराज्य स्थापूनच. महाराष्ट्रातील सामान्य जनतेवर मुस्लिम सत्तेकडून वेळोवेळी अन्याय-अत्याचार केले जात होते. या अन्याय अत्याचाराला पायबंध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलकी प्रशासन व्यवस्थेने सर्वत्र कायदा व सुव्यवस्था निर्माण केली. या प्रशासन व्यवस्थेमध्ये शिलेदारांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण अशीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलकी प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करीत असताना केंद्रीय प्रशासन व्यवस्था, लष्करी प्रशासन व्यवस्था, प्रांतिय प्रशासन व्यवस्था आणि न्याव्यवस्था अशी चार भागात विभागणी करण्यात आली आहे.

Fields of Study & Subjects

South Asian Studies and Diaspora Indigenous Cultures and History Historical and Political Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
10 February 2026
Language
MR