छतरपत शवज महरजचय लषकर परशसनतल शलदरच कमगर
Abstract
छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळे हाताशी धरून वयाच्या १६-१७ व्या वर्षाच्या बालवयात स्वराज्य स्थापनेच्या कार्याला सुरूवात केली होती. पुढील काही वर्षात त्यांच्या प्रयत्नांना यश येत गेल्याने स्वराज्याचा व्यापही वाढीस लागला व इ.स. १६७४ मध्ये एक विशाल सेना घेऊन त्यांनी कर्नाटकाची मोहिम हाती घेतली व त्यांनी त्यात यशही संपादन केले. तीस वर्षाच्या अल्पकाळात महाराजांनी आदिलशाहीचा अनेकदा पराभव केला व मुघलांना ही तोडीसतोड टक्कर दिली. या सर्व कार्यात पायदळ, घोडदळ यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. मराठ्यांच्या संरक्षणाची सर्व भिस्त ही किल्ल्यावर होती. त्यामुळे किल्ल्याची बांधणी, आखणी, जागेची निवड, डागडुजी, शिबंदी, रसद व्यवस्था इत्यादी गोष्टी महत्त्वपूर्ण समजल्या जात होत्या. ब्राह्मण, मराठा, रामोशी, प्रभु अशा वेगवेगळ्या जाती पातीच्या लोकांची किल्ल्यावर नेमणूक केली जात होती. याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या जातीपातीचे लोक वेगवेगळ्या किल्ल्यावरील कामावर त्यांच्या अंगी असणाऱ्या कर्तृत्वाप्रमाणे नेमले की, किल्ल्यात फितुरी व्हायची भिती राहत नसे. किल्लेदार, सबनीस, सुभेदार, वेसकर आदी अधिकाऱ्यांच्या कर्तव्याच्या जबाबदाऱ्याची लेखी नोंदी सापडतात. किल्ल्याच्या रक्षणार्थ ठेवलेली फौज व मुलुखगिरीवर जाणारी फौज वेगवेगळी असे. प्रत्येक किल्ल्यावर अन्नधान्य, चारापाणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याची व्यवस्था चोखपणे केली जात असे. दारूगोळा साठवायला भांडारे असत व सर्वांची सबनीस नोंद ठेवीत. अशा रितीने बातमी, संरक्षण, अन्नधान्य व्यवस्था, करवसुली व पगार यांची योग्य रीतीने सांगड घातली जात असे. लढाईत किंवा मोहिमेवर महाराज हजर असताना सर्व सैन्यावर ते स्वतः ताबा ठेवत असत. परंतु सैन्य व्यवस्था चालविण्यासाठी सेनापतीची नेमणूक केली जात असे. वेळप्रसंगी सेनापती सुद्धा खंदा लढवय्या असल्यामुळे सैन्य घेऊन स्वतः ही कामगिरी पार पाडत असे. मोरोपंत पिंगळे व घोडेस्वारावरचे अधिकारी नेताजी पालकर इतिहास प्रसिद्ध वीर आहेत. मुलकी व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्याप्रमाणे लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका महाराज स्वतः करत असत. तसेच त्यांची कामगिरी समाधानकारक न झाल्यास त्यांना पदावरून तात्काळ दूर करताना महाराज मागे पुढे पाहत नसत. उदाहरणार्थ नेताजी पालकर यांची विजापुरकरांबरोबर झालेल्या मुघल आणि मराठे यांच्या संयुक्त फौजेने केलेल्या लढाईत कामगिरी समाधानकारक न झाल्यामुळे त्यांना सेनापती पदावरून पायउतार केले. एकंदरीत नाईक या सर्वात खालच्या लष्करी अधिकाऱ्यापासून ते सरनोबत या सर्वश्रेष्ठ लष्करी अधिकाऱ्यापर्यंत सैन्याची बांधणी करण्याची विशेष अशी प्रथा प्रथमच शिवाजी महाराजांमुळे आली. सैन्याच्या अधिकाऱ्यांना शिवपूर्व काळात 'मोकासे' देण्याची पद्धती नष्ट करून त्यांना नगदी पगार देण्याची पद्धती त्यांनी सुरू केली. तत्कालीन काळातील मराठा लष्कराचे तळ आणि मुघली लष्कराचे तळ यांच्या स्वरूपात जमीन-अस्मानाचे अंतर होते. मुघल लष्करी छावणीचा डामडौल, भपकेपणा, दिमाख शिवकालीन मराठा लष्करी छावणीत नव्हता. लष्करी प्रमुख शिलेदारांना देखील साध्या तंबूत राहावे लागत असे आणि लष्कर उघड्यावर राहत असल्याचे निदर्शनास.
Fields of Study & Subjects
South Asian Studies and Diaspora
Military history and social perspectives
Military History and Strategy
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 10 February 2026
- Language
- MR