महवदयलयन वदयरथयमधल भवनक परपकवत आण परकषवषयक चत पतळच अभयस

Read full text
Authors: गणेश वायकोस
Cited by: 0

Abstract

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शारीरिक आरोगयासोबत मानसिक आरोग्य देखील महत्वाचे असते. नवीन शिक्षण प्रणालीच्या वापरामुळे आणि स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक व भावनिक दडपण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या चिंता पातळीत वाढ होत असून त्याचा भावनिक स्थैर्यावरही परिणाम होत आहे असे अनेक संशोधने दर्शवितात. प्रस्तुत अभ्यासाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील भावनिक परिपक्वता आणि परिक्षाविषयक चिंता पातळीचा अभ्यास करणे हा आहे. प्रस्तुत संशोधनासाठी परभणी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून १८-२५ वर्षे वयोगटातील २८० विद्यार्थ्यांची निवड यादृच्छ पद्धतीने (Random Sampling) करण्यात आली. त्यातून १८० विद्यार्थी संशोधनासाठी अंतिम स्वरूपात निवडण्यात आले. विद्यार्थ्यांचीभावनिक परिपक्वता मापन करण्यासाठी सिंग आणि भार्गव (१९९०) यांनी तयार केलेली भावनिक परिपक्वता मापन चाचणीचा उपयोग करण्यात आला आणि विद्यार्थ्यांच्या परिक्षाविषयक चिंता पातळीचे मापन डॉ. मधु अग्रवाल आणि मिस वर्षा कौशल यांनी विकसित केलेल्या विद्यार्थ्यांची परिक्षा विषयक चिंता चाचणी (Students’ Examination Anxiety Test) (SEAT) या चाचणीच्या साह्याने करण्यात आले. प्रस्तुत संशोधनात प्राप्त प्रदत्ताचे विश्लेषणासाठी मध्यमान, प्रमाण विचलन, टी-चाचणी, एकमार्गी प्रचरण विश्लेषण या संख्यकीय पद्धतींचा उपयोग करण्यात आला आणि सहसंबंधाचे मापन गुणाकार परिबलन सहसंबंध (Karl Pearson’s r) पद्धतीने करण्यात आले. प्रस्तुत संशोधनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षण शाखेनुसार भावनिक परिपक्वता आणि परिक्षाविषयक चिंता पातळीमध्ये फरक दिसून आला. तसेच भावनिक परिपक्वतेच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये लिंगभेद आढळला नाही. मात्र परिक्षा विषयक चिंतेच्या बाबतीत मुलींची परिक्षा विषयक चिंतेची सरासरी पातळी मुलांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आढळली. त्याचप्रमाणे भावनिक परिपक्वता आणि परिक्षाविषयक चिंता पातळी यांच्यात नकारात्मक सहसंबंध आढळला. प्रस्तुत संशोधन हे आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्याशारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतो.

Fields of Study & Subjects

Student Stress and Coping Emotional Intelligence and Performance Child and Adolescent Psychosocial and Emotional Development

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR