ठण जलहयमधल शतपरक वयवसयमधल सध आण आवहन - एक अभयस

Read full text
Authors: रुपेश वासुदेव पाटील, किशन एस. बाभुळगावकर
Cited by: 0

Abstract

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असला तरी देखील केवळ शेती उत्पादनाच्या आधारे ग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी यांचा विकास घडून आणणे शक्य नाही. म्हणूनच देशामध्ये शेती आणि शतकरी यांना सहाय्य करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयामधील स्थिती देखील काही वेगळी नाही . महाराष्ट्रातील औद्योगिकिकरण झालेला जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे जिल्हयामध्ये आज देखील एकूण ८०७ गावे असून या गावांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. एवढेच नाही तर जिल्ह्यामधी शहापूर तालुका आज देखील आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो.त्यामुळे जिल्हयामधील शेती आणि शेतकरी यांचा विकास करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांच्या विकास आणि विस्ताराची नितांत आवश्यकता आहे. म्हणून जिल्हयामधील शेतीपूरक व्यवसायांचा झालेला विकास अभ्यासणे आवश्यक आहे. शेतीपूरक व्यवसायांचा विकास अभ्यासताना जिल्ह्यातील शेतीपूरक व्यवसायाचे महत्व, शेतीपूरक उद्योगांसामोरील अडचणी यांचा अभ्यास करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उपाय योजना सुचविण्यात आल्या आहे.

Fields of Study & Subjects

Agricultural Economics and Practices Agricultural Development and Management Social and Economic Development in India

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 January 2026
Language
MR