सवततरयततर कळतल औदयगक धरणत बदल

Read full text
Authors: भानुदास भागवत मदने
Cited by: 0

Abstract

स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या औद्योगिक धोरणात देशाच्या आर्थिक गरजा, जागतिक परिस्थिती आणि विकासदृष्टी यानुसार टप्प्याटप्प्याने बदल होत गेले. १९४८ च्या पहिल्या औद्योगिक धोरणात संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग, सार्वजनिक-खाजगी क्षेत्रांचे वर्गीकरण आणि नियोजनाचा पाया घातला गेला. १९५६ च्या धोरणाने समाजवादी दृष्टिकोन स्वीकारून मूलभूत व अवजड उद्योग, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार आणि संतुलित विकासावर भर दिला. १९७० च्या दशकात धोरणात्मक सुधारणा करून जिल्हा उद्योग केंद्रे, विदेशी भांडवल व तंत्रज्ञानाला निवडक प्रोत्साहन देण्यात आले. १९८० मध्ये रोजगारनिर्मिती, प्रादेशिक विषमता कमी करणे आणि कृषी-आधारित उद्योगांना चालना देणे ही उद्दिष्टे केंद्रस्थानी होती. १९९० व १९९१ मध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाला गती देत परवाना राज कमी करण्यात आला व परकीय गुंतवणुकीस दारे उघडली. २०१४ नंतरचे धोरण स्वावलंबन व जागतिक उत्पादन केंद्र बनण्यावर केंद्रित असून मेक इन इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, आत्मनिर्भर भारत, PLI योजना, सेमीकंडक्टर व ग्रीन हायड्रोजन मिशन यांसारख्या उपक्रमांनी उत्पादन, गुंतवणूक, निर्यात व रोजगार वाढीस चालना दिली. कोविड-१९मुळे आलेल्या मंदीनंतर २०२१-२२ पासून औद्योगिक उत्पादनात पुनरुज्जीवन झाले. एकूणच, मोठ्या उद्योगांसोबत लघु-कुटीर उद्योगांना प्रोत्साहन, नवोपक्रम, कौशल्यविकास आणि ग्रामीण-शहरी समतोल साधत औद्योगिक विकासाद्वारे देशाचा सर्वांगीण आर्थिक-सामाजिक विकास साधणे हे धोरणांचे मुख्य ध्येय आहे

Fields of Study & Subjects

Indian Economic and Social Development Economic and Industrial Development Asian Industrial and Economic Development

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR