बलभषच महततव :महरषटरतल परदशक भषक ववधतच अभयस
Abstract
महाराष्ट्र हे भारतातील भाषिकदृष्ट्या व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण असे राज्य आहे.महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे.परंतू संपूर्ण राज्यात मराठी एकसंघ न राहता विविध प्रादेशिक बोली,उपभाषांच्या स्वरुपात विकसित झाली आहे.भौगोलिक रचनेतील विविधता,ऐतिहासिक सत्तांतर,सामाजिक संरचना व स्थलांतराच्या घटकांमुळे भाषिक विविधता निर्माण झाली.महाराष्ट्राच्या भौगोलिक विभागांनुसार कोकण,खानदेश,विदर्भ व मराठवाडा हे विभाग होतात.याच विभागानुसार मराठी भाषेच्या कोकणी,देशी,खानदेशी खानदेशी वऱ्हाडी आणि मराठवाडी अशा प्रमुख बोली अस्तित्वात आहेत.प्रत्येक बोलीच्या उच्चारात,शब्दसंपदेत,लकबी यांच्यात फरक आढळतो.या बोलींशिवाय महाराष्ट्रात भिल्ली,गोंडी,वारली,कातकरी सारख्या आदिवासींच्या बोलीही बोलल्या जातात.या बोली मौखिक परंपरेने चालत आलेल्या असल्यामुळे त्यातून परंपरा,श्रद्धा,जीवनदर्शन,व सांस्कृतिक मूल्ये त्यातून प्रतिबिंबित होतात.महाराष्ट्रात प्रादेशिक भाषिक विविधतेमुळे लोकसाहित्य अधिक समृद्ध झालेले आहे.आधुनिक काळात इंग्रजाचे वाढते प्राबल्य ,जागतिकीकरण,प्रसारमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात मानवावर पडणारा प्रभाव या सर्वांमुळे बोलीभाषा नव्या पिढीपासून दूर जात असल्याचे दिसून येते.बोलीभाषेचे अस्तित्व टिकवायचे असेल तर त्या भाषांचे जतन,दस्ताऐवजीकरण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग म्हणजेच ही प्रादेशिक भाषिक विविधता आहे.या विविध भाषांचे संरक्षण केले तरच भाषिक आणि सांस्कृतिक वारसा टिकून राहील.
Fields of Study & Subjects
Linguistic Variation and Morphology
Linguistic and Sociocultural Studies
Linguistic research and analysis
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR