गरमण कथ एक दषटकषप
Abstract
या लेखात मराठी ग्रामीण कथेचा उदय, विकास आणि प्रवास यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. साहित्य व समाज यांचे अतूट नाते स्पष्ट करत लेखक समाजाचे प्रतिनिधित्व कसे करतो हे मांडले आहे. १९६० नंतर सामाजिक-राजकीय बदलांमुळे साहित्य अधिक वास्तवाभिमुख झाले आणि ग्रामीण लेखकांची अस्मिता जागी होऊन ग्रामीण साहित्याचा स्वतंत्र प्रवाह निर्माण झाला. ग्रामीण संस्कृती ही भारतीय संस्कृतीचे मूळ असून शेती, माती, परंपरा, रूढी-रीती, लोकविश्वास यांचे प्रतिबिंब ग्रामीण कथेत दिसते. महात्मा फुले यांच्यापासून आधुनिक मराठी ग्रामीण साहित्याची सुरुवात झाली असे मानले जाते. हरिभाऊ आपटे यांच्या ‘काळ तर मोठा कठीण आला’ या कथेला पहिली ग्रामीण कथा मानले जाते. यानंतर वि.स. सुखटणकर, लक्ष्मण सरदेसाई, ग.ल. ठोकळ, श्री. म. माटे, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, उद्धव शेळके आदी कथाकारांनी ग्रामीण जीवनाचे विविध पैलू—दारिद्र्य, नातीगोती, श्रद्धा-अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष संबंध, विनोद व वेदना—प्रभावीपणे मांडले. साठोत्तरी काळात आनंद यादव, रा. रं. बोराडे, मधु मंगेश कर्णिक यांसारख्या लेखकांनी वास्तववादी, संवेदनशील आणि अनुभवाधिष्ठित ग्रामीण कथा लिहिल्या. समकालीन काळातही ग्रामीण कथा प्रवाह समृद्ध असून आसाराम लोमटे, किरण गुरव, किरण येले इत्यादी कथाकार ग्रामीण वास्तवाचे सूक्ष्म चित्रण करतात. एकूणच मराठी ग्रामीण कथा हा वास्तव, आशय, भाषा व कलात्मकतेच्या दृष्टीने समृद्ध झालेला महत्त्वाचा वाङ्मयप्रवाह आहे.
Fields of Study & Subjects
South Asian Studies and Diaspora
Literature: history
themes
analysis
Folklore
Mythology
and Literature Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR