उचच मधयमक सतरवरल वदयरथयचय सशल मडय वपरचय सवय आण सयबर सरकष जणव - एक अभयस
Abstract
आजच्या डिजिटल युगात उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थी अभ्यासापासून मनोरंजनापर्यंत इंटरनेटवर अवलंबून आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि युट्युब यांसारख्या माध्यमांमुळे माहितीचे आदानप्रदान सोपे झाले असले, तरी सायबर गुन्ह्यांचा धोकाही तितकाच वाढला आहे. विद्यार्थ्यांचा सोशल मीडियावरील वाढता वावर आणि त्या तुलनेत सायबर सुरक्षेबाबत असलेली त्यांची अनभिज्ञता हा सध्या चिंतेचा विषय आहे. सायबर सुरक्षा म्हणजे आपले कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट अकाउंट्स आणि वैयक्तिक माहितीला हॅकर्स, व्हायरस आणि ऑनलाइन धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे. प्रस्तुत संशोधनाद्वारे इयत्ता ९ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया वापराच्या सवयी आणि सायबर सुरक्षेबाबतची त्यांची जागरूकता यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे.
Fields of Study & Subjects
Impact of Technology on Adolescents
Privacy
Security
and Data Protection
Information and Cyber Security
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR