लकगतमधल जवनदषट : एक वशलषण

Read full text
Authors: वंदना माधव चव्हाण
Cited by: 0

Abstract

लोकसाहित्यामधून महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. महाराष्ट्र हा सातपुडा, सह्याद्रीच्या डोंगररांगात, कृष्णा, नर्मदा, तापी, गोदावरी, नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेला तसेच विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश अशा भौगोलिक विविधतेने नटलेला, माणदेशी,अहिराणी, भिलोरी, वऱ्हाडी, खानदेशी, पावरी, मावची अशा विविध बोलींनी समृद्ध असलेला प्रांत आहे. मराठी लोकगीतांमधून लोकजीवनातील सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित होताना दिसतो. मराठी लोकसाहित्यात लोकगीतांची प्रदीर्घ व प्राचीन परंपरा आहे. स्त्रीगीते, जात्यावरच्या ओव्या, अंगाईगीते, सणउत्सवांची गाणी, खेळगाणी, नृत्यगीते, श्रमपरिहारार्थ गायिली जाणारी भलरी गीते भारुड, पोवाडे, गोंधळादरम्यान गायली जाणारी गाणी, भोंडल्याची गाणी, वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, आदिवासी गीते, मोटेवरची गाणी, पेरणी करतानाची गाणी, लावणी, गवळण, कोकणीगीते, दिवाळीची गाणी, लग्नाची गाणी, कोजागिरीची गाणी, पावसाची गाणी, अशा अनेक अनेकविध प्रकारांनी ही लोकगीत-परंपरा बहरली, समृद्ध झाली आहे.लोकगीतांच्या आविष्कार परंपरेतून व लोकगीतांच्या मौखिक संहितांमधून याचा प्रत्यय लोकजीवनात येत असतो. मराठी संस्कृतीच्या जडणघडणीचा मागोवा घेण्यासाठी लोकगीते हे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. लोकगीतांचा अभ्यास हा सांस्कृतिक, सामाजिक, मानवशास्त्रीय व ऐतिहासिक दृष्टिकोनातून बहुस्पर्शी अंगाने करता येतो. लोकजीवनातील दैनंदिन व्यवहार, जनसामान्यांच्या भावभावना, सुख -दुःखे, विचार, आत्माविष्कार लोकगीतांमधून प्रकट होताना दिसतो, त्यामुळे लोकगीतांमधून तत्कालीन सामाजाच्या जीवनदृष्टीचा शोध घेता येतो.

Fields of Study & Subjects

Folklore Mythology and Literature Studies Cultural and Mythological Studies Cultural and Sociopolitical Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR