परभण जलहयतल वलरच ऐतहसक महततव : एक अभयस

Read full text
Authors: जाधव अनुसया बाबासाहेब
Cited by: 0

Abstract

सारांश : मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यात वसलेले वालूर हे गाव प्राचीन मंदिर स्थापत्य, शिल्पावशेष, मठ, बारव व लोकपरंपरांमुळे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. वालूर हे महर्षी वाल्मिकी यांच्याशी संबंधित असल्याची लोकमान्यता असून शैव, शाक्त व वैष्णव परंपरेतील अनेक प्राचीन मंदिरे येथे आढळतात. सिद्धेश्वर, तुळजाभवानी, नगरेश्वर, वाल्मिकेश्वर, माणकेश्वर व चिंतेश्वर ही मंदिरे तसेच सिद्धराम बादशहा मठ या स्थापत्यसमूहातून चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मराठा व मध्ययुगीन इस्लामी प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे प्रसिद्ध असलेली वर्तुळाकार पायऱ्यांची बारव याच ठिकाणी आहे. प्रस्तुत संशोधन लेखात वालूर गावाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा, स्थापत्य वैशिष्ट्यांचा व सांस्कृतिक महत्त्वाचा अभ्यास करण्यात आला आहे.

Fields of Study & Subjects

Indian and Buddhist Studies Religious Tourism and Spaces Archaeology and Cultural Heritage

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR