२०४७ मधल मधयम : मदरत आण डजटल पतरकरत

Read full text
Authors: बालाजी विठ्ठलराव पवार
Cited by: 0

Abstract

२०४७ मधील माध्यमे : मुद्रित आणि डिजिटल पत्रकारिता” या संशोधन प्रबंधात भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या संभाव्य स्वरूपाचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्युटेनबर्गच्या प्रिंटिंग प्रेसपासून ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मेटाव्हर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत माध्यमांचा झालेला ऐतिहासिक विकास या लेखात विश्लेषित केला आहे. मुद्रित पत्रकारिता आणि डिजिटल पत्रकारिता यांतील संक्रमण, तांत्रिक बदल, आर्थिक आव्हाने, नैतिक मूल्ये आणि लोकशाहीतील माध्यमांची भूमिका यांचा सखोल ऊहापोह करण्यात आला आहे. या अध्ययनात वर्णनात्मक व विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करून द्वितीयक स्रोतांच्या आधारे भविष्यकालीन प्रवाहांचा वेध घेण्यात आला आहे. २०४७ मध्ये मुद्रित व डिजिटल माध्यमे सहअस्तित्वात राहतील, परंतु डिजिटल माध्यमांचे वर्चस्व वाढेल, असे गृहित धरले आहे. एआय-आधारित लेखन, डेटा पत्रकारिता, नागरी पत्रकारिता, तसेच फेक न्यूज व डीपफेक यांसारखी आव्हाने भविष्यातील पत्रकारितेच्या नैतिकतेवर परिणाम करतील. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना विश्वासार्ह, वस्तुनिष्ठ व तंत्रज्ञान-सुसंगत पत्रकारिता ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यावश्यक ठरेल, हा या अभ्यासाचा प्रमुख निष्कर्ष आहे.

Fields of Study & Subjects

Journalism and Media Studies Media Studies and Communication Media Journalism and Communication History

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 February 2026
Language
MR