मधयमक सतरवरल वदयरथयसठ बहवषय (इगरज, वजञन, गणत व समजशसतर) शकषणक सपदणक चचणच नरमत

Read full text
Authors: शशिकांत त्र्यंबक निकम, अविंत शिवाजी पाटील
Cited by: 0

Abstract

संशोधकाने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एस. एस. सी. बोर्ड अंतर्गत माध्यमिक स्तरातील इयत्ता नववी इयत्तेसाठी इंग्रजी, विज्ञान, गणित व समाजशास्त्र या विषयासाठी बहुविषय शैक्षणिक संपादणूक चाचणी तयार करून प्रमाणित केली. शैक्षणिक संपादणूक चाचणी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये नियोजन, तयारी, प्रश्नांची निवड, चाचणी, गुणांकन व विश्लेषण यांचा समावेश होता. तज्ञांशी चर्चा व विद्यार्थ्यांवर चाचणीचे प्रशासन करून मूळ ३० प्रश्न कमी करून २० प्रश्न ठेवले गेले. नंतर अडचणीचे प्रश्न वगळले गेल्यावर १८ प्रश्नांची मसुदा चाचणी तयार करण्यात आली. प्रत्येक घटकाचे विश्लेषण केल्यानंतर अंतिम स्वरुपात १६ प्रश्न ठेवले गेले. यांत वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश होता. प्रत्येक विषयास २० गुण देण्यात आले होते. चाचणीची विश्वसनीयता तपासण्यासाठी क्रॉन्बॅक अल्फा गुणांक (Cronbach’s Alpha) हे साधन वापरण्यात आले. हा एक सांख्यिकीय गुणांक आहे. तो विशेषतः आंतरिक सुसंगतता तपासण्यासाठी वापरला जातो. प्रस्तुत चाचणीची विश्वसनीयता स्थापित करण्यासाठी अंतर्गत सुसंगती पद्धत वापरण्यात आली. अंतर्गत सुसंगतीचे प्रमाण 'क्रॉन्बॅक अल्फा' (Cronbach’s Alpha) या गुणकाद्वारे मोजले गेले. Bohrnstedt & Knoke (१९९४) यांच्या मते, क्रॉन्बॅक अल्फा गुणकाचा निकाल ०.७० पेक्षा जास्त असेल तर प्रश्नावली विश्वासार्ह मानली जाते. प्रस्तुत चाचणीचा क्रॉन्बॅक अल्फा ०.७४ आलेला असून चाचणी स्विकारण्याजोगी विश्वसनीय असून तिची अंतर्गत सुसंगती चांगली आहे. प्रस्तुत संशोधन लेखामुळे माध्यमिक स्तरावरील मराठी माध्यमाच्या शाळांतील इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, विज्ञान, गणित व समाजशास्त्र या विषयासाठी बहुविषय शैक्षणिक संपादणूक चाचणी तयार करून तिची विश्वसनीयता व प्रमाणीकरण प्रक्रिया तसेच यांवर आधारीत पथदर्शक अभ्यास करण्यासाठी मदत होते.

Fields of Study & Subjects

Educational Assessment and Pedagogy Educational Technology and Assessment Student Assessment and Feedback

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 February 2026
Language
MR