MOOC परणमकरकतचय सदरभत झललय परव सशधनच आढव

Read full text
Authors: सचिन अशोक पोरे, सुभाष एस. सोनुने
Cited by: 0

Abstract

एकविसाव्या शतकातील वेब-आधारित तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे Massive Open Online Courses (MOOCs) हे उच्च शिक्षणातील एक महत्त्वाचे साधन म्हणून उदयास आले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणसामग्रीपर्यंत व्यापक प्रवेश, लवचिकता आणि आयुष्यभर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे MOOCs चे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रस्तुत संशोधनात MOOCs ची परिणामकारकता, अंमलबजावणीतील आव्हाने, विद्यार्थी सहभाग, अभिप्रायाची भूमिका तसेच MOOC रचनेचा प्रभाव यांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित साहित्याचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. पूर्व संशोधनातून असे दिसून येते की MOOCs मुळे शिकणाऱ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षणसंधी उपलब्ध होत असल्या तरी विद्यार्थी सहभागाचा अभाव, अभ्यासक्रम पूर्णता दर कमी असणे, प्रत्यक्ष संवादाची मर्यादा आणि प्रभावी अभिप्राय पद्धतींचा अभाव ही प्रमुख आव्हाने आहेत. भारतातील SWAYAM सारख्या राष्ट्रीय Platforms मुळे MOOCs ला संस्थात्मक मान्यता मिळाली असली तरी अभियांत्रिकी व विज्ञान शिक्षणासाठी आवश्यक असलेले कौशल्य विकास आणि प्रत्यक्ष संवाद पुरेशा प्रमाणात साध्य होत नसल्याचे आढळते. MOOCs वरील संशोधन प्रवृत्तींच्या अभ्यासातून असे स्पष्ट होते की बहुतांश संशोधन मर्यादित विषयक्षेत्रांवर केंद्रित असून, सैद्धांतिक चौकटींचा प्रभावी वापर तुलनेने कमी आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या सहभागावर अभिप्रायाचा महत्त्वपूर्ण प्रभाव असून, अभिप्रायाचा प्रकार, वेळ, आशय हे घटक सहभाग वाढविण्यात निर्णायक ठरतात. याशिवाय, कृतीसंशोधन आधारित MOOC डिझाइनमध्ये शिकणाऱ्यांचा सक्रिय सहभाग, सतत अभिप्राय आणि सहकार्यात्मक दृष्टिकोन यांमुळे अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढू शकते, असे निष्कर्ष आढळून आले आहेत. सदर साहित्यसमीक्षेच्या आधारे असे म्हणता येते की, भविष्यात MOOCs अधिक प्रभावी करण्यासाठी सहभागवर्धक अभिप्राय पद्धती, आणि शिकणाऱ्यांच्या गरजांनुसार अभ्यासक्रम विकसन करणे अत्यावश्यक आहे. प्रस्तुत संशोधन हे MOOCs च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी धोरणकर्ते, शिक्षक व संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरते.

Fields of Study & Subjects

Online Learning and Analytics Online and Blended Learning Open Education and E-Learning

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
27 February 2026
Language
MR