परचन भरतय कल : सगत, नतय आण नटय

Read full text
Authors: नंदा पंढरीनाथ कंधारे
Cited by: 0

Abstract

भारताच्‍या विविध प्रदेशात विविध कला विकसील झाल्‍या आहेत. त्‍यामुळे भारतीय संस्‍कृतीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारतीय परंपरपेनुसार कला त्‍या सर्व क्रियांना म्‍हटले जाते, ज्‍यामध्‍ये कोणतेही कौशल्‍य अपेक्षित असते. कला म्‍हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी होय. प्राचीन भारतात ६४ कला शिकविल्‍या जात होत्‍या. या ६४ कलांना चार श्रेणींमध्‍ये विभागले जात होते. कला – ज्ञान (ज्ञान), कला-शास्‍त्र (कौशल्‍यकला), कला-रुप (दृश्‍यकला) आणि कला-क्रिया (विधीविषयक कला). या सर्व ६४ कलांचे एकच ध्‍येय आहे, जे देव आणि मानव यांच्‍यात सुसंवाद निर्माण करणे आहे. कला शब्‍दाचा सर्वप्रथम शब्‍दप्रयोग भरत मुनीने ‘नाट्यशास्‍त्र’ या ग्रंथात केला आहे. भरतमुनीच्‍या ‘नाट्यशास्‍त्र’ त्‍या ग्रंथात नाट्यकलेचे विविध पैलू नियमावली आणि तत्‍व यांचे विवेचन केले आहे. भारतीय संगीत प्राचीन काळापासून संपन्‍न आहे. निरनिराळे राग, ताल आणि वाद्यांचा वापर भारतीय संगीतात केला जातो. भारतीय नृत्‍यकलेचा इतिहासही गौरवशाली आहे. भरतनाट्यम, कथकली, कुचिपुडा इत्‍यादी नृत्‍यप्रकार भारतात प्रसिध्‍द आहेत.

Fields of Study & Subjects

Indian and Buddhist Studies Arts and Performance Studies Theatre and Performance Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 February 2026
Language
MR