आधनक भरततल महल चळवळच इतहस : शकषण आण समनतसठच सघरष
Abstract
सारांश 19 व्या शतकात भारतात स्त्री शिक्षण आणि समानतेसाठी अनेक चळवळी झाल्या. याचे महत्त्वाचे कारण या काळातील ब्रिटिशांचे आगमन होय. ब्रिटिशांनी धर्मप्रसारासाठी शिक्षणाचे महत्त्व वाढविले. ब्रिटिशांच्या या धोरणाचा फायदा भारतीय स्त्रियांनाही झाला. ब्रिटिशांच्या काळात काही महत्त्वाचे कायदे झाले, जसे की सतीबंदी कायदा विधवा, पुनर्विवाह कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, स्त्री बालहत्या प्रतिबंधक कायदा स्पेशल मॅरेज ॲक्ट, वारसा हक्क कायदा, घटस्फोट कायदा प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रतिबंधक कायदा, इत्यादी अनेक. हे कायदे भारतीय तत्कालीन समाजाने मान्य केले नाहीत. पण या कायद्यांमुळे समाजात असणाऱ्या तत्कालीन प्रचलित कुप्रथांना आळा बसला. त्यामुळे स्त्रियांची होणारी अवहेलना थोड्याफार प्रमाणात कमी झाली. ब्रिटिश सरकारच्या स्त्रीविषयक आयोग आणि कायद्यांचाही इतका प्रभाव पडला नाही. पण ब्रिटिशांच्या प्रभावाखाली आलेल्या समाजसुधारकांनी समाज परिवर्तनासाठी ज्या चळवळी उभ्या केल्या त्या चळवळींचा परिणाम स्त्री जीवनावर होऊन स्त्रियांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे हक्क प्राप्त झाले.
Fields of Study & Subjects
South Asian Studies and Diaspora
Historical Gender and Feminism Studies
Colonial History and Postcolonial Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 31 January 2026
- Language
- MR