असघटत कषतरतल शतमजर महलचय समसय : एक समजशसतरय अभयस

Read full text
Authors: अर्चना बापूसो कापडे
Cited by: 0

Abstract

घोषवारा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणारा व्यवसाय म्हणजे कृषी व्यवसाय. भारतातील 70% लोक या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत .त्यापैकी 2011 च्या कृषी जनगणनेनुसार 73.20% ग्रामीण महिला कृषी व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. भारतामध्ये शेतमजूर महिला कामगार असंघटित क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील सर्वात संवेदनशील गट हा महिला शेतमजूर यांचा आहे .त्यांना कौटुंबिक जबाबदारीसह कार्यरत राहावे लागते.या शेतमजूर महिलांना अनेक कौटुंबिक ,आर्थिक, शारीरिक ,सामाजिक ,सांस्कृतिक समस्यांना तोंड द्यावे लागते. असंघटित क्षेत्रातील या शेतमजूर स्त्रिया अप्रत्यक्षरीत्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे वियोगदान देतात. तरीही त्यांच्या योगदानाचे उचित मूल्यांकन होत नाही. प्रस्तुत शोधनिबंधामध्ये शेतमजूर महिला कामगारांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती, मजुरीतील असमानता, रोजगारातील असुरक्षा ,आरोग्य व सुरक्षा यातील धोके आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा अपुरा लाभ यांचा अभ्यास केला आहे. यासाठी 'चंद्रे' गावातील शेतमजूर महिला कामगारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन संशोधनाचे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत .या निष्कर्षानुसार लैंगिक भेदभाव दूर करणे, सामाजिक सुरक्षा वाढवणे, समान मजुरी देणे आणि महिला स्नेही श्रम कायदे अमलात आणणे आवश्यक आहे.

Fields of Study & Subjects

Social and Economic Development in India Employment Labor and Gender Studies Labour Market and Migration

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR