प्राकृत सट्टक साहित्यातील स्त्री जीवन

Read full text Summarise with VIRAT
Authors: वंदना आदगोंडा पाटील
Cited by: 0

Summary

No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.

Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.

Abstract

प्रस्तुत संशोधनात प्राकृत सट्टक साहित्यातील स्त्री-जीवनाचा अभ्यास करण्यात आला आहे. प्राकृत सट्टक हे जनभाषेतील नाट्यरूप साहित्य असून त्यामध्ये तत्कालीन समाज, संस्कृती, परंपरा आणि स्त्रियांचे सामाजिक स्थान यांचे प्रतिबिंब दिसून येते. सट्टकांमध्ये नायिकेला केंद्रस्थानी स्थान देण्यात आले असून कर्पूरमंजरी, रंभामंजरी, चंद्रलेखा, आनंदसुंदरी आणि शृंगारमंजरी या सट्टकांच्या माध्यमातून स्त्रियांचे विविध पैलू स्पष्ट होतात.या साहित्यात स्त्रियांचे सौंदर्य, कला, प्रेमभावना आणि सामाजिक भूमिका यांचे आकर्षक चित्रण आढळते; परंतु त्याचवेळी बहुपत्नीत्व, स्त्रियांवरील बंधने, पुरुषसत्ताक दृष्टिकोन आणि स्त्रीला भोगवस्तू मानण्याची मानसिकता देखील दिसून येते. काही सट्टकांमध्ये स्त्रियांना मानाचे स्थान, शिक्षण आणि धार्मिक आचारांमध्ये सहभाग असल्याचे संकेत मिळतात, तर काही ठिकाणी त्यांच्या भावनिक वेदना, सवतीचे दुःख आणि सामाजिक मर्यादा अधोरेखित झालेल्या आहेत. त्यामुळे सट्टक साहित्य स्त्रियांच्या गौरव आणि मर्यादा या दोन्हींचे वास्तववादी चित्रण करते.

Fields of Study & Subjects

Indian and Buddhist Studies Folklore Mythology and Literature Studies South Asian Studies and Diaspora

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR