महिला पोलिसांचे जीवन कार्य संतुलन

Read full text
Authors: पपीता प्रल्हाद कांबळे
Cited by: 0

Abstract

स्त्रिया आज अबला राहिलेल्या नाहीत. त्यांची झेप आणि कर्तव्य सर्व दूर पसरलेले आहे. तरीही भारत देश आणखी सक्षम आणि महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने महिलांना योग्य तो मान आणि ताकद मिळणे गरजेचे आहे. आर्थिक, मानासिक, सामाजिक सर्व दिशा त्याच्यासाठी सुरक्षित आणि स्वतंत्र असल्या पाहिजेत. समाजात वावरत असताना सामाजिक रचनेनुसार आणि व्यवस्थेनुसार सर्वांना जगावे लागते, पुरातन काळापासून पुरुषी वर्चस्व पाहायला मिळते यामध्ये स्त्री कधीही सशक्त आढळत नाही. तेव्हा त्यांच्या कामाची आणि सामाजिक स्तरावर गरजही नसायची. पण आज काळ बदलला आहे त्याचप्रमाणे जगण्यातील गरजही बदलली आहे. पूर्वी घर आणि मुलांचा सांभाळ एवढे कर्तृत्व स्त्रिया करत असत, परंतु, आज अनेक सामाजिक गरजा अशा काही बदलल्या आहेत की जेथे स्त्रियांचे घराबाहेर पडणे अनिवार्य झाले आहे. आज स्त्री घर आणि काम अशी दोन्ही क्षेत्र सांभाळत आहे. आज कामाचे आणि जीवनाचे स्वरूप बदलत चालले आहे औद्योगिक, शैक्षणिक, तंत्रज्ञान क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. त्या दृष्टीने स्त्रिया त्या त्या क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणजेच काळ जसा बदलला आहे त्याचप्रमाणे स्त्रियांची भूमिका आज फक्त "चूल आणि मुले" एवढीच उरली नाही ती स्वकर्तुत्वावर अनेक दिशांचा शोध घेऊ लागली आहे, ती आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होऊ लागली आहे. "स्त्री एक सुंदर कुटुंब आणि सुदृढ समाज घडवू शकते."

Fields of Study & Subjects

Work-Family Balance Challenges Policing Practices and Perceptions Gender Politics and Representation

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR