विकसित भारत २०४७: राष्ट्रीय शिक्षण धोरण–२०२० आणि ग्रंथालय विज्ञान शिक्षणाची भूमिका

Read full text Summarise with VIRAT
Authors: संगिता गंगाराम उतेकर
Cited by: 0

Summary

No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.

Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.

Abstract

NEP 2020 मध्ये बहुविषयक शिक्षण, संशोधन व नवोपक्रम, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, आजीवन शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या घटकांवर विशेष भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीत ग्रंथालये व ग्रंथालय विज्ञान शिक्षण (Library and Information Science – LIS) ही ज्ञानसंपत्तीची केंद्रे म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रंथालय विज्ञान शिक्षण हे केवळ माहितीचे संकलन व व्यवस्थापन न राहता ज्ञाननिर्मिती, माहिती साक्षरता, संशोधन सहाय्य, डिजिटल ग्रंथालये आणि ज्ञान व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक संकल्पनांशी जोडले गेले आहे. या संशोधन लेखाचा उद्देश विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने राष्ट्रीय शिक्षण धोरण–२०२० आणि ग्रंथालय विज्ञान शिक्षण यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास करणे हा आहे. तसेच, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs), डिजिटल समावेशन आणि ज्ञान एकात्मिकरण यामध्ये LIS शिक्षणाचे योगदान विश्लेषित करण्यात आले आहे. या अभ्यासातून असे स्पष्ट होते की, सक्षम ग्रंथालय व्यवस्था आणि आधुनिक ग्रंथालय विज्ञान शिक्षण प्रणाली विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण उत्प्रेरक ठरू शकते.

Fields of Study & Subjects

Library Science and Information Library Science and Information Literacy Information Science and Libraries

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 February 2026
Language
MR