भारतीय भाषा, साहित्य आणि ज्ञानपरंपरा यांचे विकसित भारत २०४७ शाश्वत विकासातील योगदान
Summary
No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.
Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.Abstract
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे; येथे असंख्य भाषा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि प्राचीन ज्ञानपरंपरा एकत्र येऊन भारतीय संस्कृतीला अद्वितीय रूप देतात. विकसित भारत २०४७ ही संकल्पना केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासालाही समान महत्त्व देते. भाषिक विविधता ही लोकशाही आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे; भाषा हे ज्ञानाचे प्राथमिक वाहक असल्याने स्थानिक भाषांमध्ये शिक्षण व संशोधन केल्यास ज्ञान अधिक सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख होते. साहित्य समाजाला नैतिक व मूल्याधारित दिशा देते, तर पारंपरिक ज्ञानपरंपरा पर्यावरणपूरक जीवनशैली व शाश्वत उपाय सुचवते. वेद‑उपनिषदांपासून संत साहित्य आणि आधुनिक दलित साहित्यापर्यंतचा प्रवास समाजाला न्याय, समता आणि नैतिकतेची दिशा दाखवतो. भाषेतून ज्ञान, ज्ञानातून साहित्य आणि साहित्यातून संस्कृती व परंपरेचे जतन शक्य होते. आजच्या डिजिटल युगात या परंपरांचा संवर्धन, पुनराविष्कार आणि आधुनिक विज्ञान‑तंत्रज्ञानाशी एकत्रीकरण ही काळाची गरज आहे. भारतीय भाषा, साहित्य आणि ज्ञानपरंपरा हे विकसित भारत २०४७ साठी शाश्वत विकासाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचे संवर्धन व समन्वित धोरणात्मक उपक्रम आवश्यक आहेत
Fields of Study & Subjects
Language and Culture
South Asian Studies and Diaspora
Cultural and Mythological Studies
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 28 February 2026
- Language
- MR